maharashtra

तडीपार गुंडाकडून पाच मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी : साथीदारासह दोघांना अटक

Five cases of motorcycle theft from Tadipar gangster revealed
तडीपारी आदेशाचा भंग करुन साताऱ्यातच राहून आणखी दुचाकी चोऱ्याही करणाऱ्या एका तडीपार गुंडासह चोरीत त्याचा साथीदार असलेल्या एकास शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून पाच दुचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्यात करण्यात यश मिळवले आहे.

सातारा : तडीपारी आदेशाचा भंग करुन साताऱ्यातच राहून आणखी दुचाकी चोऱ्याही करणाऱ्या एका तडीपार गुंडासह चोरीत त्याचा साथीदार असलेल्या एकास शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून पाच दुचाकी चोरीचे गुन्हे उघड करण्यात करण्यात यश मिळवले आहे.
विकास मुरलीधर मुळे (वय 22, पॉवर हाऊस झोपडपट्टी, सातारा) असे तडीपार गुंडाचे नाव असून चोरीत त्याचा साथीदार असलेला ऋत्विक धनंजय पंडित (वय 21, रा. कळकाचे बेटाजवळ, गडकरआळी, सातारा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरात मोटार सायकल चोरीचे गुन्हे वारंवार घडत असल्यामुळे शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोऱ्यांचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केल्या होत्या. त्या अनुषंगाने शाहूपुरी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार हे मोटार सायकल चोरीतील आरोपींचे बाबत माहिती घेत असताना त्यांना गोपनिय माहिती मिळाली की, अभिलेखावरील तडीपार गुंड हा त्याच्या घराच्या परिसरात फिरत असून त्याने मोटार सायकली चोरी केलेल्या आहेत.
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार सदर तडीपार चोरटयाचे घरी जावून चेक करीत होते परंतु तो त्याच्या झोपडपट्टीतील बोळाचा व डोंगराचा फायदा घेत पळून जात होता.  गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांनी सलगपणे त्याच्या मागावर राहून दि. 7 ऑगस्ट रोजी तो मुंबई येथे पळुन जाण्याच्या तयारीत असताना त्याला सातारा, एस.टी.स्टँड परिसरातुन पाठलाग करुन ताब्यात घेतले व त्याचेवर तडीपार कारवाईचा भंग केले बाबतचा गुन्हा नोंद करुन कारवाई केली आहे.
सदर गुन्हयाचे तपासामध्ये त्याच्याकडेे अधिक विचारपुस केली असता त्याने प्रथम उडवा-उडवीची असमाधानकारक उत्तरे देत होता. गुन्हे प्रकटकीरण शाखेचे अधिकारी/अंमलदार यांनी त्याच्याकडेे कौशल्यापुर्वक विचारपुस केली असता त्याने प्रथम सुमारे 15 दिवसांपुर्वी गोल मारुती मंदिराचे जवळुन एक काळे रंगाची प्लेजर मोटार सायकल चोरी केल्याची कबुली देवुन सदरची मोटार सायकल सातारा शहरात फिरवत असताना ती शाहु चौकात बंद पडल्याने तेथेच सोडल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे त्याचेकडुन गुन्हयातील चोरीस गेलेली 15000/- रुपये किंमतीची मोटार सायकल जप्त करणेत आली आहे.
त्यानंतर त्याचेकडे मोटार सायकल चोरीचे अनुशंगाने गुन्हे शाखेचे पथकाने त्याचेकडे अधिक विचारपुस केली असता त्याने सातारा शहरातील विविध ठिकाणाहुन मोटार सायकली चोरी केल्याचे व त्या वापरुन बेवारस सोडुन दिल्याची माहिती दिली. सदर माहितीचे आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेने अभिलेखाची पडताळणी केली असता त्याबाबत शाहुपूरी पोलीस ठाणेस मोटार सायकल चोरीचे गुन्हे नोंद असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तडीपार इसमाकडुन खालील प्रमाणे मोटार सायकल चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणले असून या चोऱ्यामध्ये त्याचा साथीदार असलेल्या युवकास देखील पोलिसांनी अटक केली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, पोलीस हेडकॉन्स्टेबल हसन तडवी, लैलेश फडतरे, पोलीस नाईक अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, पोलीस कॉन्स्टेबल सचिन पवार, स्वप्निल सावंत, पोलीस हवालदार चंद्रकांत माने यांनी केली आहे.