महाराष्ट्र शासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे हजारो निवृत्त प्राथमिक शिक्षकांचे हाल
निधी उपलब्ध केला नसलेमुळे निवृत्त प्राथमिक शिक्षकाची पेंशन अनियमित
प्राथमिक शिक्षकांचे पेंशन गेली वर्षभर अनियमित झाली आहे. या संदर्भात साहसवार्ता समोर व्यथा मांडताना वयोवृद्ध शिक्षकाचे डोळ्यातील अश्रू अनावर
सातारा
महाराष्ट्र शासनाने निधी उपलब्ध केला नसलेमुळे निवृत्त प्राथमिक शिक्षकाची पेंशन अनियमित झालेचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाले असून जीवनभर सरकारी कामासाठी कमी तेथे प्राथमिक शिक्षकाने काम केले आहे. अशा प्राथमिक शिक्षकांचे पेंशन गेली वर्षभर अनियमित झाली आहे. या संदर्भात साहसवार्ता समोर व्यथा मांडताना वयोवृद्ध शिक्षकाचे डोळ्यातील अश्रू अनावर झालेचे दिसून आले . बहुतांशी शिक्षक सेवा निवृत्तीनंतर पेंशन वरच अवलंबून असून त्यातूनच त्यांचा उदरनिर्वाह तसेच आजारपणाचे औषधउपचार सुरु आहेत. गेली वर्षभर तीन महिनेतून एकदा अशी पेंशन जमा होत असलेमुळे औषधउपचार तसेच उदरनिर्वाहाची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. वय जास्त असलेमुळे कर्जही मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये या निवृत्त शिक्षकांनी करायचे तर काय असा प्रश्न निर्माण झालेशिवाय राहत नाही. गेली दोन वर्ष संपूर्ण जग कोविड -१९ च्या प्रदुर्भवासामुळे त्रस्त आहे. अशावेळी पेंशन वर उपजीविका करणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांवर पेंशन अनामित होणे म्हणजे दुहेरी संकटच ओढवले आहे. पेंशनधारक मुख्यतः जेष्ठ नागरिक असलेमुळे औषधउपचार सुरूच असतात या औषधउपचारासाठी त्यांची तारांबळ उठलेली बघवत नाही. पेंशनधारकांकडून सरकार टॅक्स वसूल करते पण वय जास्त असलेमुळे विमा, कर्ज अशा सुविधांपासून वंचित पण ठेवत आहे. सरकारी नोकरांचे पगार दिवसेंदिवस वाढत आहेत पण ज्याच्या शिकवणुकीमुळे असंख्य अधिकारी निर्माण झाले, ज्याच्यामुळे पिढ्यानपिढ्या सुसंस्कृत त्या प्राथमिक शिक्षकांचे नशिबी हे दिवस आले आहेत हे खूप दुर्दैवी आहे.
प्रशासन स्तरावर आम्ही महाराष्ट्र्र शासनाशी संपर्कात असून लवकरात लवकर यावर उपाययोजना करून पेंशन नियमित करू : मा. श्री. विनय गौडा जी. सी. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा
शासनाकडे सर्वांसाठी द्यायला पैसे आहेत पण ज्यांनी शिक्षण व्यवस्थेसाठी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा वेळ दिला त्यांना निवृत्ती नंतर उदरनिर्वाहासाठी द्यायला पैसे नाहीत , फार मोठी शोकांतिका आहे, ज्यांनी युवा पिढी घडविली, त्यांचे नशिब घडवले, आज हाच घडवणाराच उपाशी आहे. या निवृत्त शिक्षकांना महिनाअखेर पर्यंत जर पेंशन नाही मिळाली तर आम्ही संघटनेच्या वतीने सरकारविरुद्ध आंदोलनं छेडणार : महारुद्र तिकुंडे ( माहिती अधिकार ) संस्थापक अध्यक्ष, युवा राज्य फौंडेशन


