येथील गोडोलीतील एका गॅरेजसमोरून दुचाकी चोरीला गेल्याची घटना दि. २० रोजी रात्री दहा वाजता समोर आली.
सातारा : येथील गोडोलीतील एका गॅरेजसमोरून दुचाकी चोरीला गेल्याची घटना दि. २० रोजी रात्री दहा वाजता समोर आली.
शुभम बाळकृष्ण जाधव (वय १९, रा. मूळ रा. पिंपोडे बुद्रुक, ता.कोरेगाव, सध्या रा. गोडोली) याने त्याची दुचाकी (एमएच ११ सीएन ८५७६) एका गॅरेजसमोर उभी केली होती. अज्ञात चोरट्याने बनावट चावीने दुचाकी चोरून नेली. सातारा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, पोलीस नार्इक वाघमारे हे अधिक तपास करीत आहेत.


