maharashtra

सुरूर येथून दुचाकीची चोरी


सुरूर, ता. वाई येथून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद भुईंज पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : सुरूर, ता. वाई येथून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद भुईंज पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 14 ते 15 डिसेंबर दरम्यान सागर उद्धव बागल वय 35 रा. सुरूर, ता. वाई यांची 15 हजार रुपये किमतीची हिरो कंपनीची दुचाकी क्रमांक एमएच 11 सीवाय 70 20 ही घराच्या अंगणात पार्क केली असताना अज्ञात चोरट्याने या दुचाकीची चोरी केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार भोसले करीत आहेत.