maharashtra

कार्वे गावच्या हद्दीतील महिलेच्या खुनाचा गुन्हा चार तासात उघड

सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि कराड तालुका पोलीस ठाण्याची कारवाई

The murder of a woman in Karve village limits was uncovered in four hours
कार्वे, ता. कराड गावच्या हद्दीत महिलेचा झालेल्या खुनाचा गुन्हा चार तासात उघडकीस आणण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.  शरद हणमंत ताटे, वय ३३, रा. येरावळे, ता. कराड  असे अटक केलेल्या संशयित इसमाचे नाव आहे. तर खुन झालेल्या महिलेचे नाव वनिता आत्माराम साळुंखे, वय ३०, रा. महिंद, ता. पाटण असे असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

सातारा : कार्वे, ता. कराड गावच्या हद्दीत महिलेचा झालेल्या खुनाचा गुन्हा चार तासात उघडकीस आणण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले.  शरद हणमंत ताटे, वय ३३, रा. येरावळे, ता. कराड  असे अटक केलेल्या संशयित इसमाचे नाव आहे. तर खुन झालेल्या महिलेचे नाव वनिता आत्माराम साळुंखे, वय ३०, रा. महिंद, ता. पाटण असे असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी, ३ जनवरी २०२० रोजी ८ वाजण्याच्या पुर्वी कार्वे, ता. कराड गावच्या हद्दीत भैरवनाथ मंदिरा शेजारून कृष्णा नदीच्या पात्राकडे जाणाऱ्या मार्गावर ३० ते ३५ वर्षीय अज्ञात महिलेचा अज्ञात इसमाने तिचा खून करून तिचा मृतदेह टाकून देण्यात आल्याची तक्रार कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलीस अधीक्षक अजय बंसल यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना हा गुन्हा उघडकीस करण्याच्या सुचना दिल्या होत्या.
किशोर धुमाळ यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश असलेले पथक तपासासाठी घटनास्थळी पाठवण्यात आले होते. तेथील परिस्थितीची माहिती घेऊन किशोर कुमार यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पथकाने तपास केला असता खुन झालेल्या महिलेजवळ एक चिट्ठी मिळाली. त्याची टीम मध्ये एका इसमाचे नाव नमूद होते. त्या इसमाने मला लग्न करतो म्हणून आणले, माझ्याशी संबंध ठेवले व माझ्याबरोबर लग्न करत नसून मला मारहाण करून माझ्याशी संबंध ठेवले. मी जीव दिला अथवा मला काय झाले तर त्याच तो जबाबदार आहे असा मजकूर त्या चिठ्ठीमध्ये नमुद होता. त्या चिठ्ठी समवेत संबंधित इसमाच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत होती. त्या अनुषंगाने माहिती घेऊन पथकाने चिठ्ठीमध्ये नमूद असलेल्या इसमाच्या मिळवण्याकडे तपास केली असता त्याने त्या महिलेचा खुन केला असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या बहिणीस चिट्टीमध्ये नाव नमुद असलेला इसम मारहाण करून त्रास देत असल्याने त्यास खुनाच्या गुन्ह्यात अडकविण्याकरता संबंधित इसमाने वनिता आत्माराम साळुंखे, वय ३०, रा. महिंद, ता. पाटण या महिलेचा खून केला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या कारवाईत पोलीस हवालदार शरद बेबले, साबिर मुल्ला, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, रोहित निकम, विशाल पवार, मयूर देशमुख, मोहसीन मोमीन, कराड तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक भरत कांबळे, पोलीस हवालदार धनंजय कोळी, सजन जगताप, उत्‍तम कोळी यांनी भाग घेतला.

स्थानिक गुन्हे शाखेने केली एका वर्षात तब्बल 14 क्लिष्ट गुन्ह्यांची उकल
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी पदभार स्विकारल्यानंतर अतिशय क्लिष्ट असलेल्या 14 गुन्ह्यांची उकल एका वर्षात करण्यात यश मिळवले आहे. किशोर धुमाळ यांची समयसूचकता आणि त्यांचे टीम नेटवर्क यामुळेच हा गुन्हा उघडकीस आला असल्याची भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.