maharashtra

यादोगोपाळ पेठेत दुचाकीची चोरी


Theft of a two-wheeler in Yadogopal Peth
येथील यादोगोपाळ पेठेत पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : येथील यादोगोपाळ पेठेत पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २४ जुलै रोजी ८ ते दि.२५ जुलै रोजी १० वाजण्याच्या दरम्यान सातारा येथील यादोगोपाळ पेठ, गोल मारुती मंदिरजवळ पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम.एच.११ एयु १०४७ ही अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार मिलिंद विजय देशपांडे रा. चिंतामणी प्लाझा, यादोगोपाळ पेठ, सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.