maharashtra

जबरी चोरी प्रकरणी एकावर गुन्हा


घरात घुसून जबरी चोरी केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : घरात घुसून जबरी चोरी केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 21 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास रेहाना अशपाक शेख वय 46 राहणार शनिवार पेठ, सातारा या घरात असताना आकाश राजकुमार राठोड वय 22 राहणार शनिवार पेठ, सातारा याने शेख यांच्या घरात प्रवेश करून 80 हजार रुपयांचे मिनी गंठण आणि अडीच हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे अधिक तपास करीत आहेत.