maharashtra

जिल्ह्यात दोन दारू अड्ड्यांवर छापे


पोलिसांनी सातारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या दारू अड्डयावर छापे टाकून ४ हजार ४८० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.

सातारा : पोलिसांनी सातारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या दारू अड्डयावर छापे टाकून ४ हजार ४८० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निमसोड, ता. खटाव गावच्या हद्दीत तेथीलच अविनाश उर्फ काकासो शिवाजी देशमुख यांच्याकडून १ हजार ३३० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या, बिबवी, ता. जावली गावच्या हद्दीत पेट्रोल पंपासमोरील एका हॉटेलच्या आडोशाला सुरू असणाऱ्या देशी दारूच्या अड्डयावर छापा टाकून ३ हजार १५० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.