सातारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी झाल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन दुचाकींची चोरी झाल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ६ ते दि. ७ ऑगस्ट दरम्यान सातारा येथील यादोगोपाळ पेठ येथे पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम.एच. ११ बीइ ६७७२ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार अनिल बाळकृष्ण वांगीकर, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. दुसऱ्या घटनेत दि. ९ ऑगस्ट रोजी १२.३० ते ३ वाजण्याच्या दरम्यान दहिवडी, ता. माण गावच्या हद्दीत एका घरासमोर पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम.एच. ११ एटी ७२५३ अज्ञात चोरट्याने चोरल्याची तक्रार किसन मारुती शिंदे रा. राणंद, ता. माण यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.


