maharashtra

एकास मारहाण केल्याप्रकरणी 17 जणांवर गुन्हा


एकास मारहाण केल्याप्रकरणी 17 जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी 17 जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 18 ऑक्टोबर रोजी चार वाजण्याच्या सुमारास शाहू स्टेडियम समोरील औद्योगिक तांत्रिक विद्यालय येथे अलीशेर नासिर खान वय 15, रा. वडूथ, ता. सातारा हा त्याच्या मित्रांबरोबर गप्पा मारत बसलेला असताना साहिल येवले हा तेथे आला त्याने खान यास धमकी दिली. तसेच सातारा एसटी स्टँड पर्यंत खान याचा पाठलाग करून त्याला लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण केली. याचबरोबर साहिल येवले याचा भाऊ व इतर पंधरा अनोळखी मुलांनी खान यास लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि ते पळून गेले. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार करपे करीत आहेत.