maharashtra

शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा


शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 30 जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान मोबाईल घेतल्याचा संशय घेऊन सिंधू उत्तम कांबळे वय 53 राहणार लक्ष्मी टेकडी सदर बाजार सातारा यांना त्याच परिसरात राहणार्‍या छोटू शेख (पूर्ण नाव माहित नाही), भुरी छोटू शेख यांनी शिवीगाळ व दमदाटी केली. याबाबतचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक माने अधिक तपास करीत आहेत.