maharashtra

आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा


शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 11 मार्च रोजी संध्याकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील कला वाणिज्य कॉलेज, शुक्रवार पेठ, सातारा येथील मैदानात सुरू असलेल्या रंगपंचमी कार्यक्रमात ऋतिक उर्फ विजय विनोद कांबळे रा. बुधवार नाका, सातारा हा सातारा जिल्ह्यात शस्त्रबंदी कायदा लागू असताना त्याचा भंग करून विनापरवानगी कोयता नाचवत असताना दिसून आला व साहिल जमीर जमादार हा पळून गेला आहे. याप्रकरणी दोघांवरही शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.