maharashtra

वीज बिल थकित प्रकरणी तीन स्टोन क्रशर चालकांवर गुन्हे

थकवले तब्बल 72 लाख रुपयांचे वीज बिल

Crimes against three Stone Crusher drivers in electricity bill fatigue case
शहरालगत महामार्गावर असलेल्या नागेवाडी गावच्या हद्दीतील स्टोन क्रशर चालकांनी वीज बिलात फेरफार करुन लाखो रुपयांचे विज बिल भरले नसल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात स्वतंत्र 3 गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, तब्बल 72 लाख रुपयांचे बिल संशयित तिघांनी थकवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सातारा : शहरालगत महामार्गावर असलेल्या नागेवाडी गावच्या हद्दीतील स्टोन क्रशर चालकांनी वीज बिलात फेरफार करुन लाखो रुपयांचे विज बिल भरले नसल्याप्रकरणी तिघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात स्वतंत्र 3 गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, तब्बल 72 लाख रुपयांचे बिल संशयित तिघांनी थकवल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
कनिष्ठ अभियंता गणेश जाधव यांनी वैभव आबासो सावंत, माणिकसिंग चतुरसिंग रजपूत, संतोष चतुरसिंग रजपूत, लिला चतुरसिंग रजपूत (सर्व रा.नागेवाडी ता.सातारा) यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. तक्रारदार यांनी तक्रारीत म्हटले आहे की, संशयितांचे शांभवी नावाचे स्टोन क्रशर आहे. संशयितांना वीज वापरासाठी दिलेल्या कनेक्शनची विज रक्कम 37 लाख 87 हजार 580 रुपयांचे वीज बिल भरले नाही. तसेच मीटरमध्ये फेरफार करुन वीज वापरदार चोरी करत असल्याचे आढळून आले असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
कनिष्ठ अभियंता गणेश जाधव यांनी दुसरी तक्रार सौ.पल्लवी मनोज शेंडे (रा.नागेवाडी ता.सातारा) यांच्याविरुध्द पोलिस ठाण्यात दिली आहे. तक्रारदार यांनी तक्रारीत म्हटले आहे की, संशयितांना नागेवाडी येथे वीज कनेक्शन दिले असून त्यापैकी 12 लाख 85 हजार 630 रुपयांचे वीज बिल भरलेले नाही. तसेच मीटरमध्ये फेरफार वीज चोरी करत असल्याचे समोर आले आहे.
तिसरी तक्रार कनिष्ठ अभियंता गणेश जाधव यांनी प्रमोद नरसिंह साळवी (रा.नागेवाडी ता.सातारा) यांच्या विरुध्द दिली आहे. तक्रारदार यांनी तक्रारीत म्हटले आहे की, संशयित प्रमोद साळवी यांचे नागेवाडी येथे श्री साई नावाचे स्टोन क्रशर आहे. त्यांनी 27 लाख 74 हजार 380 रुपयांचे वीज बिल थकवले आहे. तसेच मीटरमध्ये फेरफार करुन वीजेची चोरी करत असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, हे सर्व गुन्हे भारतीय विद्युत अधिनियम कायदा 2003 चे कलम 135 अन्वये दाखल करण्यात आले आहेत.