maharashtra

अवैधरित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा


अवैधरित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी पाच जणांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सातारा : अवैधरित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी पाच जणांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 25 मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता सुमारास उंब्रज तालुका कराड गावच्या हद्दीत उंब्रज-चोरे रस्त्यावरील वखारीजवळ सुरज मनोहर गावडे, उमा सुरेश गावडे, कृष्णा महादेव कदम तिघेही राहणार उंब्रज, तालुका कराड आणि कृष्णा सुनील बोरगे राहणार मांगवाडी तालुका कराड, निरंजन फुलचंद मानकर राहणार कळंत्रेवाडी तालुका कराड पाच जणांच्या कब्जात बेकायदा बिगर परवाना दोन लोखंडी कोयते आणि दोन लोखंडी सत्तुर आढळून आले. याप्रकरणी या पाच जणांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक सोरटे करीत आहेत.