येथील शाहूपुरीत वास्तव्यास असलेले बांधकाम व्यावसायिक प्रकाश महिपतराव महाडिक यांच्या पत्नी सौ. हिराबाई प्रकाश महाडिक यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 61 वर्षे होते.
सातारा : येथील शाहूपुरीत वास्तव्यास असलेले बांधकाम व्यावसायिक प्रकाश महिपतराव महाडिक यांच्या पत्नी सौ. हिराबाई प्रकाश महाडिक यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 61 वर्षे होते.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मनमिळावू स्वभावाच्या म्हणून परिसरात त्या परिचित होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. सावडणे विधी गुरुवार दि. 16 रोजी सकाळी 9 वाजता संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमी येथे होणार आहे.


