maharashtra

सातारा येथे दोघांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल


Both were charged with molestation in Satara
सातारा येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनेमध्ये दोघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहे

सातारा : सातारा येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनेमध्ये दोघांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन २०२१ ते २३ मार्च २०२२ दरम्यान सातारा शहर परिसरात इस्माईल हमीद खान, वय १७, रा. निसर्ग कॉलनी सातारा याने एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून मला तुझ्याशी बोलायचे आहे, असे म्हणत तिला थांबवून मला तुझा मोबाइल नंबर दे, म्हणून तिला त्रास नेल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
दुसऱ्या घटनेत दि. २५ मार्च रोजी पाच वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात ओंकार मांडवे, वय २३, रा. शाहूपुरी, सातारा याने दुचाकीवरून एका १९ वर्षीय मुलीचा पाठलाग करून तिला गाडी आडवी मारून, तु माझा मोबाइल ब्लॉक काढ, नाहीतर तुला व तुझ्या बहिणीला काय करेल हे तुला नाही समजणार नाही अशी धमकी दिल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.