maharashtra

दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात आपणही पडू शकतो हे लक्षात ठेवा

नरेंद्र पाटील : आ. शशिकांत शिंदे यांच्यावर केली बोचरी टीका

Remember that you too can fall into the pit dug for another
आ. शशिकांत शिंदे हे माझे सहकारी आहेत. परंतु, जिल्हा बँक निवडणूकीच्या राजकारणात नेमके काय घडले? हे मला माहित नाही. मी त्या प्रचार प्रक्रियेत नव्हतो. मात्र, आपण दुसऱ्यासाठी जेव्हा खड्डा खणतो, तेव्हा कधीतरी आपणही त्याच खड्ड्यात पडतो, हे त्यांनी लक्षात ठेवावे, अशी बोचरी टीका माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्यावर केली.

कराड : आ. शशिकांत शिंदे हे माझे सहकारी आहेत. परंतु, जिल्हा बँक निवडणूकीच्या राजकारणात नेमके काय घडले? हे मला माहित नाही. मी त्या प्रचार प्रक्रियेत नव्हतो. मात्र, आपण दुसऱ्यासाठी जेव्हा खड्डा खणतो, तेव्हा कधीतरी आपणही त्याच खड्ड्यात पडतो, हे त्यांनी लक्षात ठेवावे, अशी बोचरी टीका माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्यावर केली.
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी २५ रोजी प्रीतिसंगमावरील त्यांच्या समाधीस अभिवादन केल्यानंतर एका प्रश्नाच्या उत्तरादाखल ते बोलत होते. याप्रसंगी त्यांच्यासोबत विविध मान्यवरांनीही स्व. चव्हाण यांच्या समाधीस अभिवादन केले.