maharashtra

जिल्ह्यातील तिघेजण बेपत्ता


जिल्ह्यातील दोन ठिकाणाहून तिघेजण हरवले असल्याची फिर्याद संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये देण्यात आली आहे.

सातारा : जिल्ह्यातील दोन ठिकाणाहून तिघेजण हरवले असल्याची फिर्याद संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये देण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 5 सप्टेंबर रोजी सौ वनिता सचिन महापुरे वय 35 या त्यांचा मुलगा मानव सचिन महापुरे वय 13 राहणार स्वराज्य नगर, गोडोली, तालुका सातारा हे दोघे कोणास काही एक न सांगता निघून गेले असल्याची फिर्याद मीरा अशोक महापुरे वय 48 यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
दुसऱ्या घटनेत दिनांक 5 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अभिजीत रामचंद्र थोरात वय 26 राहणार नडशी, तालुका कराड हे तासवडे येथील टोलनाक्यावरून कोठेतरी निघून गेले असल्याची फिर्याद तळबीड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.