मर्ढे, ता. सातारा येथून 23 वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या भावाने तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.
सातारा : मर्ढे, ता. सातारा येथून 23 वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या भावाने तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित युवती तिच्या मर्ढे गावातील राहत्या घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेली. ती परत आली नाही. तिचा शोध घेऊन ती मिळून न आल्याने तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक फौजदार बागवान करत आहेत.


