maharashtra

मोबाईलमध्ये रमलेल्या मुलांना लागली मैदानाची गोडी

नगरसेविका स्मिता घोडके यांच्या तर्फे आयोजित उन्हाळी शिबिराला उत्तम प्रतिसाद

The children playing in the mobiles got the sweetness of the field
मोबाईलमध्ये रमलेल्या मुलांना मैदानाची गोडी लागावी याकरिता माजी नगराध्यक्षा स्मिताताई घोडके यांच्या वतीने आयोजित उन्हाळी शिबिराला यंदा उत्तम प्रतिसाद मिळाला. सात ते पंधरा वयोगटातील सुमारे अडीचशे मुलांनी या शिबिरात भाग घेतला होता. कराटे प्रशिक्षणासह हस्तकला, चित्रकला विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सातारा : मोबाईलमध्ये रमलेल्या मुलांना मैदानाची गोडी लागावी याकरिता माजी नगराध्यक्षा स्मिताताई घोडके यांच्या वतीने आयोजित उन्हाळी शिबिराला यंदा उत्तम प्रतिसाद मिळाला. सात ते पंधरा वयोगटातील सुमारे अडीचशे मुलांनी या शिबिरात भाग घेतला होता. कराटे प्रशिक्षणासह हस्तकला, चित्रकला विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात यशस्वीरित्या भाग घेतलेल्या मुलांना नुकतेच प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
माजी नगराध्यक्ष स्मिता घोडके यांनी शनिवार पेठेतील गोरक्षण बोळातील श्रीमंत छत्रपती राजमाता जिजाऊ क्रीडा संकुल परिसरात या विविध शिबिरांचे आयोजन केले होते. मुलांनी मैदानी खेळ खेळावेत, मोबाईल पासून दूर रहावे, विविध उपक्रमात भाग घ्यावा यासाठी सुलताना मुजावर यांच्या वतीने कराटे प्रशिक्षण मुलांना देण्यात आले. किरण शुभम चौकवाले यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला व हस्तकला वर्ग घेण्यात आले. चित्रकला व हस्तकला उपक्रमासाठी सात ते पंधरा वयोगटातील 125 मुलांनी सहभाग घेतला होता, तर कराटे प्रशिक्षणासाठी 75 मुलांची नोंद झाली होती.
हे शिबिर 23 मे ते 29 मे असे सात दिवस राबवण्यात आले. या शिबिराला मुलांचा आणि पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. कोरोनाच्या गेल्या दोन वर्षाच्या कठीण प्रसंगातून गेल्यामुळे मुलांमध्ये मैदानी खेळांची आवड कमी झाली होती. ती वाढविण्यासाठी तसेच मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खेळ हा उत्तम व्यायाम प्रकार आहे. त्याकरिताच हे शिबिर आयोजित करण्यात आल्याचे माजी नगराध्यक्ष स्मिता घोडके यांनी सांगितले. येत्या दिवाळीच्या सुट्टीतही अशाच वेगवेगळ्या शिबिरांचे आयोजन केले जावे, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.