maharashtra

२ लाख २० हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणी अज्ञातावर गुन्हा


नोकरीच्या आमिषाने शेंदुरजणे, ता. वाई येथील एका युवतीची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात इसमावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : नोकरीच्या आमिषाने शेंदुरजणे, ता. वाई येथील एका युवतीची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात इसमावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, शेंदुरजणे, ता. वाई येथील प्रगती बाळासाहेब जगताप वय २३ या युवतीला अज्ञात इसमाने मोबाईलवरून फोन करून  तुमची जावा डेव्हलपर्स या पोस्टसाठी निवड झाली असून तुम्ही पैसे ट्रान्सफर करा, असे सांगितले. त्यानंतर प्रगती जगताप हिने नातेवाईक व मित्र-मैत्रिणी यांच्या मोबाईलवरून २ लाख २० हजार रुपये ट्रान्सफर केले. मात्र तिला नोकरी न लागल्याची तक्रार तिने वाई पोलीस ठाण्यात दिली.