maharashtra

घारेवाडीत एकाला चाकूने भोकसले


One was stabbed in Gharewadi
घारेवाडी (जुने) ता. कराड येथे मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एकाला जिवे मारण्याची धमकी देत चाकूने भोकसले. रविवारी 6 रोजी जुने येथील मंदिरासमोरील रस्त्यावर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी संतोष दतु लोकरे (वय 42) रा. येरवळे यांनी पोलिसात फिर्याद दिली असीन त्यानुसार कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कराड : घारेवाडी (जुने) ता. कराड येथे मुलांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एकाला जिवे मारण्याची धमकी देत चाकूने भोकसले. रविवारी 6 रोजी जुने येथील मंदिरासमोरील रस्त्यावर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी संतोष दतु लोकरे (वय 42) रा. येरवळे यांनी पोलिसात फिर्याद दिली असीन त्यानुसार कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमर रघुनाथ पवार असे चाकू हल्यात गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. तर याप्रकरणी लक्ष्मण तुकाराम जाधव दोघेही रा. घारेवाडी ता. कराड असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रविवार रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास जुने घारेवाडी येथील समाज मंदिरासमोरील रस्त्यावर गावातील मुलांची आपसात भांडणे चालली होती. ती भांडणे सोडवण्यासाठी अमर पवार हे गेले असता लक्ष्मण जाधव याने पवार यांना जिवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. तसेच खिशातील चाकू काढून तीन वेळा भोकसून वार केले. या हल्यात अमर पवार यांच्या छातीच्या डाव्या बाजुस, तसेच छातीवर डाव्या खांद्याजवळ व उजव्या हाताच्या काखेत मोठी जखम झाली.
त्यानंतर याबाबतची माहीती पवार यांचे साडू संतोष लोकरे यांना मिळाली. त्यानंतर ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले असता त्यांना रघुनाथ पवार हे गंभीर जखमी असलेले आढळून आले. त्यामुळे लोकरे यांनी तात्काळ पवार यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी लक्ष्मण जाधव यांच्यावर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पुढील तपास ग्रामीण पोलिस करीत आहेत.