maharashtra

अस्तित्व लपवल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा


Crime against three in concealment case
मसुर, ता. कराड येथील संजयनगर परिसरात घराच्या पाठीमागे अंधरात अस्तित्व लपवून चोरी सारखा एखादा गुन्हा करण्याच्या उद्देशाने आढळून आल्या प्रकरणी तीन जणांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कराड : मसुर, ता. कराड येथील संजयनगर परिसरात घराच्या पाठीमागे अंधरात अस्तित्व लपवून चोरी सारखा एखादा गुन्हा करण्याच्या उद्देशाने आढळून आल्या प्रकरणी तीन जणांवर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ रोजी १२.१५ वाजण्याच्या सुमारास मसूर येथील संजयनगर परिसरात एका घराच्या पाठीमागे अंधारात तन्वीर अल्ली पटेल, वय २८, आशितोष दगडू भोसले, वय २४, दोघेही रा. वाघेरी, ता. कराड आणि महेश सुरेश साठे, वय २७, रा. कोर्टी, ता. कराड हे तीन जण स्कार्पिओ गाडी क्रमांक एम. एच.१२ जीव्ही ७३०८ मध्ये आपले अस्तित्व लपून चोरी सारखा एखादा गुन्हा करण्याच्या उद्देशाने मिळून आल्याची तक्रार पो. ना. राजेंद्र माने यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल केली.