सातारा तालुक्यातील वर्ये येथील लिंबखिंडकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर असणाऱ्या चहाच्या टपरीचर चहा पिताना ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत मजूर जखमी झाला. दरम्यान, या ट्रॅक्टरच्या धडकेत एका दुचाकीचाही चेंदामेंदा झाला आहे. याप्रकरणी जखमी मजूराच्या पत्नीने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : सातारा तालुक्यातील वर्ये येथील लिंबखिंडकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर असणाऱ्या चहाच्या टपरीचर चहा पिताना ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेत मजूर जखमी झाला. दरम्यान, या ट्रॅक्टरच्या धडकेत एका दुचाकीचाही चेंदामेंदा झाला आहे. याप्रकरणी जखमी मजूराच्या पत्नीने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल झाला आहे.
साहिल गायकवाड असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नव्हती.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मीनाक्षी संदीप सदामते (वय २५) आणि त्यांचे पती संदीप सुरेश सदामते (वय ३५, दोघे रा. ठक्करनगर, लिंबखिंड, नागेवाडी, ता. सातारा. मूळ रा. यल्लमा मंदिराशेजारी, चैतन्यनगर, पलूस, ता. पलूस, जि. सांगली ) हे दाम्पत्य मजूर आहे. शुक्रवार, दि. ७ रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वर्ये गावच्या हद्दीत लिंबखिंडकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर असणाऱ्या संगप्पा पाटील यांच्या पाटील चहा टपरीजवळ चहा पित उभे होते. यावेळी साताऱ्याकडून लिंबखिंडीच्या दिशेने ब्लेड जोडलेला ट्रॅक्टर येत होता. यावर चालक म्हणून साहिल सुरेश गायकवाड (रा. सदरबझार, सातारा) हा होता. तो रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवत होता. यावेळी याची जोराची धडक संदीप सदामते यांना बसली. ही धडक इतकी जोराची होती की, यात संदीप गंभीर जखमी झाले. त्यांच्या कमरेला, पायाला आणि पाठीला मार लागला आहे. दरम्यान, या ट्रॅक्टरच्या धडकेत उभी केलेली दुचाकी (एमएच ११ - बीडब्ल्यू ६४९८) चेपून, फुटून तिचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबतची तक्रार मीनाक्षी सदामते यांनी दिल्यांनतर ट्रॅक्टरचालक साहिल गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल झाला असून रात्री उशिरापर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास पोलीस नाईक मालोजी चव्हाण करत आहेत.


