जुन्या भांडणाच्या कारणातून एकाला मारहाण केल्याची घटना सातार्यात घडली असून याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : जुन्या भांडणाच्या कारणातून एकाला मारहाण केल्याची घटना सातार्यात घडली असून याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या भांडणाच्या कारणातून लोखंडी रॉड, विटांच्या तुकड्यांनी मारहाण केल्याप्रकरणी धनराज मांढरे, संग्राम भंडारे, प्रेम आडागळे (सर्व रा.शाहूपुरी परिसर) यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 19 रोजी मांढरे आळी येथे घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


