लोणंद बस स्थानकातून दोन मंगळसूत्रांची चोरी झाल्याच्या तक्रारी लोणंद पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.
सातारा : लोणंद बस स्थानकातून दोन मंगळसूत्रांची चोरी झाल्याच्या तक्रारी लोणंद पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 17 नोव्हेंबर 2022 रोजी लोणंद तालुका खंडाळा गावच्या हाती असलेल्या लोणंद बस स्थानकातून एसटीमध्ये चढत असताना वंदना नामदेव शिंदे रा. चव्हाणवाडी, ता. फलटण यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किंमतीचे व सासवड येथील रंजना नेमचंद भुजबळ रा. सासवड, ता. फलटण यांचे 20 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे. याबाबतच्या तक्रारी लोणंद पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या असून अधिक तपास पोलीस नाईक पवार करीत आहेत.


