maharashtra

रिक्षाचालकाला मारहाण करुन लुटणार्‍या टोळीचा पर्दाफाश

शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाची कारवाई

Exposing the gang who robbed by beating the rickshaw puller
रिक्षा भाड्याने करण्याचा बहाणा करुन रिक्षाचालकास कोंडवे, ता. सातारा गावच्या हद्दीत नेवून रिक्षाचालकाला मारहाण करुन लुटणार्‍या टोळीचा शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या (डीबी) पोलिसांनी पर्दाफाश केला. दरम्यान, हे कृत्य तडीपार गुंडाने केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सातारा : रिक्षा भाड्याने करण्याचा बहाणा करुन रिक्षाचालकास कोंडवे, ता. सातारा गावच्या हद्दीत नेवून रिक्षाचालकाला मारहाण करुन लुटणार्‍या टोळीचा शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या (डीबी) पोलिसांनी पर्दाफाश केला. दरम्यान, हे कृत्य तडीपार गुंडाने केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
विपुल तानाजी नलवडे (वय 21, रा.पिलेश्वरीनगर, करंजे, सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सिराज अब्दुल कादर बागवान (रा . यादोगोपाळ पेठ) यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार सिराज हे दि. 8 रोजी रिक्षा स्टॉपवर रिक्षा थांबले असताना तेथे तीन युवक आले व त्यांनी सैदापूरकडे जायचे असल्याचे सांगितले. रिक्षा चालकाने रिक्षा नेत असताना संशयितांनी रिक्षा कोंडवे रस्त्यावर घेण्यास सांगून निर्जनस्थळी रिक्षा थांबवण्यास सांगितले. या घटनेनंतर संशयितांनी रिक्षा चालकाला लोखंडी रॉडने मारहाण करत रिक्षा चालकाकडील मोबाईल हॅन्डसेट, रोख रक्कम व रिक्षा क्र.एम.एच. 11 सीजे 4666 असा एकूण 76,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरुन नेला.
तक्रारदाराने सातारा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिस तपास करत असताना शाहूपुरी पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज सापडले. त्यानुसार त्यातील एक सराईत संशयित सैदापुर कॅनॉल परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. शाहूपुरी डीबीने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून आणखी दोन साथीदार असल्याचे सांगितले. दरम्यान, संशयिताला तडीपार करण्यात आले असल्याचेही तपासात समोर आले. त्यानुसार संशयिताला ताब्यात घेवून त्याचा ताबा तालुका पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
ही कारवाई पोनि संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिजीत यादव, फौजदार नानासाहेब कदम, पोलिस हवालदार हसन तडवी, लैलेश फडतरे, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, सचिन पवार यांनी यांनी केली आहे.