सिलेंडर स्फोटात जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : सिलेंडर स्फोटात जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राहत्या घरी सिलेंडरचा स्फोट झाल्याने डबलसिंग हिरासिंग ढकाल वय 50 राहणार मलकापूर, कराड यांना दिनांक 31 दुपारी तीन वाजता कृष्णा हॉस्पिटल कराड येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची खबर कृष्णा हॉस्पिटल तर्फे क्लार्क काळे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास पोलीस नाईक खिलारे करीत आहेत.


