maharashtra

एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा


एकास मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोंडवे ता.सातारा गावच्या हद्दीत नितीन मधुकर निंबाळकर (वय 34, रा. कोंडवे) यांना दिपक मच्छिंद्र पवार व अक्षय मानसिंग बोडके (दोघे रा. कोंडवे) या संशयित आरोपींनी रॉडने मारहाण केली. संशयितांनी रॉडने डोक्याला दुखापत केल्याने ते गंभीर जखमी झाले आहे. सातारा तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.