maharashtra

चारचाकी गाडीची चोरी


वर्धनगड, ता. खटाव गावच्या हद्दीतून चारचाकी गाडीची चोरी झाल्याची फिर्याद पुसेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

सातारा : वर्धनगड, ता. खटाव गावच्या हद्दीतून चारचाकी गाडीची चोरी झाल्याची फिर्याद पुसेगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 9 डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास सचिन तानाजी पवार रा. वर्धनगड, ता. खटाव यांची दोन लाख 25 हजार रुपये किमतीची टाटा कंपनीची चार चाकी गाडी क्रमांक एमएच 11 डीडी 0510 अज्ञात चोरट्याने पवार यांच्या घरासमोरून चोरून नेली आहे. या घटनेची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यात झाली असून पोलीस हवालदार डी. बी. बर्गे अधिक तपास करीत आहेत.