एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ऋषभ राजेंद्र पाटील रा. चिमणपुरा पेठ, सातारा हा त्याची बहीण साक्षी हिला आणण्यासाठी तिच्या सासरी गेला असता प्रतीक तानाजी कांबळे आणि संतोषी तानाजी कांबळे दोघेही रा. जकातवाडी, ता. सातारा यांनी पाटील यांस फरशीचा तुकडा, लोखंडी सळई व हाताने मारहाण केली. अधिक तपास पोलीस हवालदार निकम करीत आहेत.


