maharashtra

जाधववाडी येथील एकाची सुमारे ७ लाख रुपयांची फसवणूक

दिगंबर आगवणे यांच्यावर आणखी गुन्हा दाखल

प्लॉट विक्री करण्याचे सांगून एकाची सुमारे सात लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत गिरवी, ता. फलटण येथील दिगंबर आगवणे यांच्यावर आणखीन एक गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : प्लॉट विक्री करण्याचे सांगून एकाची सुमारे सात लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत गिरवी, ता. फलटण येथील दिगंबर आगवणे यांच्यावर आणखीन एक गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नोव्हेंबर २०१९ पासून आजपर्यंत ज्ञानेश्वर उर्फ माऊली दिनकर सावंत, रा. बिरदेव नगर, जाधववाडी, ता. फलटण यांना दिगंबर रोहिदास आगवणे, रा. गिरवी, ता. फलटण याने नांदल येथील गट नंबर ४९०/२ मधील प्लॉट नंबर ३४ व ५१ चे बनावट तयार केलेले सातबारा उतारे दाखवून त्यावर कोणत्याही बँकेचे कर्ज नाही, असा विश्वास दिला. त्यानंतर ते प्लॉट ज्ञानेश्वर उर्फ माऊली सावंत यांना ८ लाख रुपये किमतीला विक्री करण्याचे दिगंबर आगवणे यांनी ठरवले. ठरल्यानुसार दिगंबर आगवणे यांनी ज्ञानेश्वर उर्फ माऊली सावंत यांच्याकडून ६ लाख ८३ हजार रुपये घेऊन संबंधित गटातील प्लॉटची विसार नोटरी केली. मात्र ती स्वतःकडे ठेवून ज्ञानेश्वर उर्फ माऊली सावंत यांची फसवणूक केल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.