एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : एकास मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास वाढे फाटा येथील हॉटेल श्रीकृष्ण समोर अक्षय अरविंद पानसकर रा. सैदापूर, ता. सातारा यांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी पप्पू शेठ आणि अतुल (पूर्ण नाव पत्ता माहीत नाही) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बोडरे करीत आहेत.


