maharashtra

कर्जाच्या आमिषाने महिलेची फसवणूक


Deception of a woman by the lure of debt
तीन लाख रुपयांच्या कर्जाच्या आमिषाने १ लाख ६९ हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणी एकावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सातारा : तीन लाख रुपयांच्या कर्जाच्या आमिषाने १ लाख ६९ हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणी एकावर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,श्रीमती मंदा राजू जाधव रा. रहिमतपुर यांनी वृत्तपत्रातील कर्ज विषयक जाहिरात पाहून अतुल जगताप (पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही) याला त्याच्या मोबाइल क्रमांकावर फोन करून आपल्याला कर्ज हवे असल्याचे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत अतुल जगताप याने मुद्रा फायनान्स पंतप्रधान जनधन योजनेतून एका दिवसात एक लाखापासून दहा लाखापर्यंत कर्ज मिळेल असे सांगितले.  तद्नंतर नंत मंदा जाधव यांच्याकडून त्याने दि. २७ डिसेंबर २०२१ ते  दि. १ फेब्रुवारी २०२२ पर्यंत त्यांच्या बँक खात्यावरून १ लाख ६९ हजार रुपये काढून त्यांना कर्जत न देता फसवणूक केल्याची तक्रार रहीमतपुर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. अतुल जगताप यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.