maharashtra

मटकाकिंग समीर कच्छीच्या जुगार अड्ड्यावर छापा

एलसीबी ची कारवाई; 20 जणांची उचलबांगडी, 17 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

मटका बुकी शमीम सलीम शेख उर्फ समीर कच्छी या मटकाकिंगच्या सातार्‍यातील घरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) धाड टाकून त्याच्यासह 20 जणांची उचलबांगडी केली.

सातारा : मटका बुकी शमीम सलीम शेख उर्फ समीर कच्छी या मटकाकिंगच्या सातार्‍यातील घरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) धाड टाकून त्याच्यासह 20 जणांची उचलबांगडी केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे 17 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, संशयितांमध्ये सातारासह तालुक्यातील जुगार बहाद्दर पंटर आहेत.
शमिम उर्फ समीर सलिम शेख उर्फ कच्छी,  धनंजय संपतराव कदम, अश्विन विनायक माने, नासिर हुसेन दिलावर शेख, सलिम कादिर खान, शकिल कादर सय्यद, विष्णू काशिनाथ सोनटक्के, राजेश संपत कदम, विकास राजू चव्हाण, संतोष रामचंद्र माने, अक्षय जोतिराम सोनावणे, गजानन चंद्रकांत इरकल, किशोर दिलीप साळुंखे, असद वाहिद सय्यद, असिफ बशीर खान, साहिल शमिम उर्फ समीर शेख उर्फ कच्छी, संतोष मोहन गुरव, प्रकाश तानाजी बोभाटे, श्रीकांत लक्ष्मण पाटील, अमर गणेश पवार (सर्व रा. सातारा शहर व सातारा तालुका परिसर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. यातील शमिम उर्फ समीर सलिम शेख उर्फ कच्छी (रा.मोळाचा ओढा, सातारा) हा प्रमुख बुकी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शमिम उर्फ समीर सलिम शेख उर्फ कच्छी हा संपूर्ण सातारा जिल्हयातील मटका व्यावसायिकांच्या प्रमुख असून त्याच्या सर्व आर्थिकबाबी त्याच्यानुसार चालत आहेत. संशयित पोलिसांच्या रडारवर होता. रविवारी सर्व संशयित कच्छीच्या घरी जमल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार तात्काळ पथक तयार करुन त्याच्या राहत्या काळेवस्ती, सैदापूर ता. सातारा येथील घरामध्ये छापा टाकला. यावेळी कल्याण, मेन, मिलन, राजधानी, टाईम नावचा जुगार चालवत असल्याचे समोर आले. पोलिसांना पाहताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी परिसराला वेढा दिल्याने संशयितांची धरपकड करण्यात आली.
ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये १) शमिम उर्फ समीर सलिम शेख उर्फ कच्छी वय ४२ वर्ष रा. काळे वस्ती, आंगणवाडी जवळ, सैदापूर सातारा
२) धनंजय संपतराव कदम वय ५५ वर्षे रा.८९१ शनिवारपेठ सातारा,
३) अश्विन विनायक माने वय ४५ वर्ष रा.शेंद्रे
, ता.जि. सातारा,
४) नासिर हुसेन दिलावर शेख वय ४० वर्ष रा.२२२३ बुधवारपेठ सातारा,
५) सलिम कादिर खान वय ३५ वर्ष रा.६७२ शनिवारपेठ सातारा,
६) शकिल कादर सय्यद वय ५१ वर्षे
रा.२५९ शनिवारपेठ सातारा,
७) विष्णू काशिनाथ सोनटक्के वय ४५ वर्ष मुळ रा.कोरुचीमाळ बाग इचलकरंजी ता.हातकणंगले जि. कोल्हापूर सध्या रा. काळेवस्ती, आंगणवाडी शेजारी, सैदापूर सातारा,
८) राजेश संपत कदम वय ५३ वर्ष रा.७७ पिलेश्वरी नगर करंजे सातारा,
९) विकास राजू चव्हाण वय ३० वर्ष रा.३०५ शनिवारपेठ सातारा,
१०) संतोष रामचंद्र माने वय ४६ वर्ष रा. कोंडवे ता.जि.सातारा,
११) अक्षय जोतिराम सोनावणे वय २१ वर्षे रा.मुजावर कॉलनी कराड,
१२) गजानन चंद्रकांत इरकल वय ५१ वर्षे रा.४५ शुक्रवारपेठ सातारा
१३) किशोर दिलीप साळुंखे वय २६ वर्षे
रा. माळवाडी ता.जि.सातारा
१४) असद वाहिद सय्यद वय २७ वर्षे रा. जगदीश्वर कॉलनी सेदापूर
सातारा
१५) असिफ बशीर खान वय ३८ वर्षे रा. ६७२, शनिवार पेठ सातारा
१६) साहिल शमिम उर्फ समीर शेख उर्फ कच्छी वय १९ वर्षे रा. काळेवस्ती सैदापूर सातारा
१७) संतोष मोहन गुरव वय ३२ वर्षे रा.काशिळ ता.जि.सातारा
१८) प्रकाश तानाजी बोभाटे वय ३२ वर्षे रा.मुळीकवाडी ता. जि. सातारा
१९) श्रीकांत लक्ष्मण पाटील वय ६५ वर्षे रा.पाटखळ ता.जि.सातारा,
२०) अमर गणेश पवार वय २० वर्षे रा.गंगासागर कॉलनी मोळाचा ओढा सातारा. यांचा समावेश आहे.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता त्याठिकाणी सुमारे सव्वा लाखाची रोकड, कार, मोबाईल, जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल होता. पोलिसांनी तो जप्त करुन संशयितांना ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात संशयितांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोनि अरुण देवकर, पोनि विश्वजीत घोडके, सपोनि संतोष पवार, सपोनि रमेश गर्जे, फौजदार विश्वास शिंगाडे, वसंत जाधव, पोलीस उत्तम दबडे, संतोष पवार, संतोष सपकाळ, शरद बेबले, प्रविण फडतरे, मंगेश महाडीक, अमोल माने, अजित कर्णे, विशाल पवार, केतन शिंदे, मोहसिन मोमीन, मयुर देशमुख, मोना निकम, राधा जगताप यांनी कारवाईत सहभाग घेतला.