विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 22 मे ते 17 ऑगस्ट दरम्यान पती सागर अनिल अवधूत सासरे, अनिल अनंतराव अवधूत, सासू उज्वला अनिल अवधूत, शुभम अनिल अवधूत, मावस सासरे प्रशांत झाडगे मावस सासू शैला प्रशांत झाडगे (सर्व राहणार सोनगीर वाडी, वाई, तालुका वाई) यांनी पूजा सागर अवधूत यांना तुझ्या बापाने लग्नात हुंडा कमी दिला, आमचा मानपान केला नाही, असे म्हणून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.


