सातारा-रहिमतपूर रस्त्यावरील शहरालगत दत्तनगर कॅनॉल परिसरात प्राथमिक माहितीनुसार दोन दुचाकींचा अपघात होवून दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून मृतांची रात्री उशीरापर्यंत ओळख पटवण्याचे काम सुरु होते.
सातारा : सातारा-रहिमतपूर रस्त्यावरील शहरालगत दत्तनगर कॅनॉल परिसरात प्राथमिक माहितीनुसार दोन दुचाकींचा अपघात होवून दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातामध्ये एकजण गंभीर जखमी झाला असून मृतांची रात्री उशीरापर्यंत ओळख पटवण्याचे काम सुरु होते.
याबाबत अधिक माहिती अशी, हा अपघात गुरुवारी झाला. मुख्य रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातानंतर वाहतुक काही काळ ठप्प झाली. कारण मुख्य रस्त्यावरच दोघेजण रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडले होते. मन हेलावून टाकणार्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होती. स्थानिक नागरिकांनी वाहतुक सुरळीत करुन घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. अपघातात तिघांचा समावेश असल्याने त्यांना रुग्णालयात हलवले असता दोघांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले.
एमआयडीसी चौकीचे पोलिस व अपघात विभाग कामाला लागल्यानंतर रात्री उशीरापर्यंत मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु होते. घटनास्थळी दोन दुचाकी होत्या. मात्र अपघात नेमका कसा झाला? याची पोलिसांनाही माहिती नव्हती.


