maharashtra

आर्थिक फसवणूक प्रकरणी एकाविरोधात गुन्हा


अदालत वाड्याच्या पाठीमागील मिळकत मिळवून देतो, असे सांगून कमिशनचे 50 हजार रुपये व रजिस्ट्रेशनसाठी लागणारे 1 लाख 35 हजार रुपये असे एकूण 1 लाख 85 हजार रुपये घेवून एकाने फसवणूक केली.

सातारा : अदालत वाड्याच्या पाठीमागील मिळकत मिळवून देतो, असे सांगून कमिशनचे 50 हजार रुपये व रजिस्ट्रेशनसाठी लागणारे 1 लाख 35 हजार रुपये असे एकूण 1 लाख 85 हजार रुपये घेवून एकाने फसवणूक केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, याप्रकरणी निकीता गणेश माने (वय 28, रा. करंजे) यांनी महेश शंकर ढाणे (रा.पाडळी ता.सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 15 सप्टेबर ते 16 नोव्हेबर 2023 या कालावधीत घडली आहे. दरम्यान, व्यवहार होत नसल्याने तक्रारदार यांनी पैसे मागितले असता संशयिताने मारहाण करण्याची धमकी दिली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.