maharashtra

अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा


One person injured in an accident
रिक्षाला पाठीमागून झायलो गाडी ने धडक देऊन अपघातात रिक्षाचालकाला जखमी केल्याप्रकरणी झायलो चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : रिक्षाला पाठीमागून झायलो गाडी ने धडक देऊन अपघातात रिक्षाचालकाला जखमी केल्याप्रकरणी झायलो चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १८ जून रोजी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पुणे कोल्हापूर महामार्गावर  भरतगाव गावच्या हद्दीत हॉटेल राजेशाही जवळ दशरथ शंकर चौधरी, रा. रविवार पेठ, सातारा हे रिक्षा क्रमांक एम. एच .११ एजी.११२१ मधून प्रवासी घेऊन जाताना झायलो वाहन क्रमांक एम.एच.०९ बीएम  ५९९० वरील चालक इरफान इब्राहिम मुल्ला, वय ३३, राहणार काले, ता. कराड याने झायलो अविचाराने चालून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रिक्षाला पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये रिक्षा पलटी होऊन रिक्षाचालकाला जखमी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.