पाण्यात बुडून वृद्धेचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सातारा : पाण्यात बुडून वृद्धेचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शकुंतला जगन्नाथ मुळीक वय 70 रा. सोनगाव तर्फ, सातारा ही वृद्धा राहत्या घराच्या जवळ असलेल्या विहिरीजवळील जळण काढत असताना तिचा पाय घसरून विहिरीत पडली. त्यामुळे पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला आहे. याबाबतची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले असून अधिक तपास पोलीस नाईक हसबे करीत आहेत.


