maharashtra

दुचाकीची चोरी


सेंट पॉल ग्राउंड च्या समोर पार्क केलेल्या दुचाकीची अज्ञाताने चोरी केली असल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : सेंट पॉल ग्राउंड च्या समोर पार्क केलेल्या दुचाकीची अज्ञाताने चोरी केली असल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 3 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ ते पावणे दहा वाजण्याच्या दरम्यान सिद्धाराम सिताराम जांभळे वय 35 रा. लक्ष्मी टेकडी, सदर बझार, सातारा यांनी त्यांची दुचाकी क्रमांक एमएच 11 बीसी 7423 ही सेंट्रल स्कूलच्या ग्राउंड समोर पार्क केली होती. या दुचाकीची आज्ञाताने चोरी केली असल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस नाईक भोसले करीत आहेत.