पुसेसावळीत मंगळवारी मध्यरात्री दरोडेखोरांच्या टोळीने लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यानी मारहाण करत सुमारे १२ तोळे सोने, १ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम असा ५ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत जयश्री हणमंतराव माने जखमी झाल्या असून, त्याच्यावर कराड येथे उपचार सुरु आहेत.
सातारा : पुसेसावळीत मंगळवारी मध्यरात्री दरोडेखोरांच्या टोळीने लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यानी मारहाण करत सुमारे १२ तोळे सोने, १ लाख ३० हजार रुपयांची रोख रक्कम असा ५ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत जयश्री हणमंतराव माने जखमी झाल्या असून, त्याच्यावर कराड येथे उपचार सुरु आहेत. दरम्यान, याप्रकरणी संजय आप्पासो कदम यांनी पुसेसावळी पोलिसांत तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, माने कुटुंबीय रात्रीचे जेवण करुन झोपले होते. मंगळवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची पत्नी सारीका यांनी घरात कोणीतरी शिरल्याचे माहिती संजय यांना दिली. घरात शिरलेल्या दरोडेखोरांनी लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यानी मारहाण केली. यानंतर घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.


