गेल्या दहा वर्षांपासून पोलीसांना विविध गुन्ह्यांत हवा असलेल्या आरोपीस अटक करण्यात आज (गुरुवार) सातारा पोलीस दलाच्या स्थानिक गु्न्हे शाखेस यश आले आहे. संशयित आरोपीचे नाव संजय नमण्या पवार असे असून त्याच्यावर एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. तसेच पाच गंभीर गुन्ह्यात तो गेल्या दहा वर्षांपासून फरार होता.
सातारा : गेल्या दहा वर्षांपासून पोलीसांना विविध गुन्ह्यांत हवा असलेल्या आरोपीस अटक करण्यात आज (गुरुवार) सातारा पोलीस दलाच्या स्थानिक गु्न्हे शाखेस यश आले आहे. संशयित आरोपीचे नाव संजय नमण्या पवार असे असून त्याच्यावर एकूण 17 गुन्हे दाखल आहेत. तसेच पाच गंभीर गुन्ह्यात तो गेल्या दहा वर्षांपासून फरार होता.
संजय नमण्या पवार हा सासवड झणझणे (ता. फलटण) येथील माळीबेन वस्ती वडाचा मळा येथे असल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलीसांना मिळाली होती. त्यानंतर त्याला पकडण्यासाठी गेलेल्या अंमलदार आणि पोलीसांवर त्याने दगडफेक करुन तलावर व कोयत्याने तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत त्याच्यावर खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतरही त्याने सातारा जिल्ह्यात विविध गुन्हे केले होते. त्याच्यावर सन 2012 पासून जिल्ह्यातील लोणंद, खंडाळा, फलटण ग्रामीण आदी ठिकाणी खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा असे विविध स्वरुपाचे गुन्हे दाखल होते.
सातारा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेस संजय नमण्या पवार यास भुरकरवाडी गावाच्या परिसरात शस्त्रांसह असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार आज (गुरुवार) पोलीसांनी घटनास्थळी जाऊन त्यास सापळा लावूऩ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने एलसीबीच्या पथकावर हल्ला चढविला. पोलीसांनी त्यांच्या जिवाची पर्वा न करता त्यास अत्यंत शिताफीने पकडले. त्याच्यावर या हल्ला संदर्भात लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांच्या सूचनाप्रमाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, तानाजी माने, विश्वनाथ सकंपाळ, संतोष पवार, अतिष घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, कांतीलाल नवघने, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, मंगेश महाडीक, निलेश काटकर, मुनीर मुल्ला, अजित कर्णे, गणेश कापरे, शिवाजी भिसे, अमोल माने, वैभव सावंत, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, गणेश कचरे यांनी केलेली आहे.
या अधिकारी व अंमलदार यांनी मागील 10 वर्षापासुन पोलीसांना गुंगारा देत असलेल्या अट्टल गुन्हेगारास त्याच्याकडे असलेल्या घातक शस्त्रांसह आपल्या जीवाची पर्वा न करता अटक करण्याची, उल्लेखनीय कामगीरी केल्याबददल पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


