maharashtra

शेंदुरजणे येथे घरफोडी करून साडेपाच हजार रुपयांचे साहित्य लंपास


Material stolen by robbery
शेंदुरजणे, ता. वाई येथे अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून ५ हजार रुपये रोख व ५०० रुपये किमतीच्या साड्या चोरून नेल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : शेंदुरजणे, ता. वाई येथे अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून ५ हजार रुपये रोख व ५०० रुपये किमतीच्या साड्या चोरून नेल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २६ एप्रिल रोजी ७.३० ते ७.४५  वाजण्याच्या सुमारास शेंदुरजणे येथील जगताप वस्तीवरील एका घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून ५ हजार रुपये रोख व ५०० रुपये किमतीच्या साड्या चोरून नेल्याची तक्रार यशवंत काशिनाथ जगताप यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.