maharashtra

कारच्या खिडकीची काच फोडून लॅपटॉपची चोरी


अज्ञात चोरट्याने कारच्या खिडकीची काच फोडून लॅपटॉपची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : अज्ञात चोरट्याने कारच्या खिडकीची काच फोडून लॅपटॉपची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास हर्षल सुरेश साळुंखे रा. विक्रोळी पूर्व, मुंबई यांनी त्यांची गाडी क्षेत्र माहुली स्मशानभूमी शेजारी असणाऱ्या रस्त्याच्या बाजूला पार्क केली होती. दरम्यान अज्ञात चोरट्याने कारच्या खिडकीची काच दगडाने फोडून, नुकसान करून कार मधील साळुंखे यांचा 25 हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप चोरून नेला आहे. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.