maharashtra

शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा


शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास पूजा राजाराम थोरात वय 28 या सातारा शहर पोलीस ठाण्यात कर्तव्य बजावत असताना जावेद बन्सी सय्यद, पूजा जावेद सय्यद (दोन्ही राहणार सदर बाजार, सातारा), अक्षय सुरेश शिवगण, अमृता अक्षय शिवगण जया सुरेश शिवगण, पूजा सुरेश शिवगण (सर्व रा. रविवार पेठ, सातारा) हे एकमेकांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आले असताना पोलीस ठाण्यामध्ये जोरात भांडणे सुरू झाली. यावेळी पूजा थोरात आणि त्यांचे सहकारी भांडणे सोडवित असताना अमृता शिवगण हिने पूजा थोरात यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर चावा घेतला. तसेच जावेद सय्यद यांनी तेथील असलेल्या एका काचेवर डोक्यातून काचेचे नुकसान केले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे अधिक तपास करीत आहेत.