maharashtra

एकास अतित येथे शिवीगाळ


अतित, ता. सातारा येथील बसस्थानकाशेजारील रस्त्यावर एकजण दुचाकीशेजारी उभा होता. यावेळी एक जणाने दारुच्या नशेत दुचाकीवरुन येवून दुचाकी फिर्यादीच्या गाडीला धडकवली. तसेच शिवीगाळ केली.

सातारा : अतित, ता. सातारा येथील बसस्थानकाशेजारील रस्त्यावर एकजण दुचाकीशेजारी उभा होता. यावेळी एक जणाने दारुच्या नशेत दुचाकीवरुन येवून दुचाकी फिर्यादीच्या गाडीला धडकवली. तसेच शिवीगाळ केली.
हा प्रकार दि. १३ रोजी रात्री ८.१५ च्या सुमारास घडला असून, त्याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे. अमोल चंद्रकांत कदम (वय ३३, रा. अतित) यांनी फिर्याद दिली असून, श्रीमंत रामचंद्र गायकवाड (रा. अतित) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक महाडिक तपास करत आहेत.