maharashtra

दुचाकीची चोरी


कुचेकर हॉस्पिटलच्या समोर पार्क केलेल्या दुचाकीची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

सातारा : कुचेकर हॉस्पिटलच्या समोर पार्क केलेल्या दुचाकीची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी सकाळी 11 ते दुपारी दोन वाजता दरम्यान महाराजा हॉटेल च्या पाठीमागे असलेल्या कुचेकर हॉस्पिटल च्या समोर पार्क केलेली शैलेश शिवाजी लोहार राहणार विठ्ठल नगर खेड तालुका सातारा यांची वीस हजार रुपये किमतीची एक्टिवा मोपेड मोटरसायकल क्र. एमएच 11 सीटी 1114 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक मोरे करीत आहेत.