maharashtra

चाकूचा धाक दाखवून चोरीचा प्रयत्न


Attempted theft with a knife
वाढे, ता. सातारा गावच्या हद्दीत तरुणाला चाकूचा धाक दाखवून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञाताविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

सातारा : वाढे, ता. सातारा गावच्या हद्दीत तरुणाला चाकूचा धाक दाखवून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञाताविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी खंडेराव विठोबा नवघणे वय ४९, रा. वासोळे, ता. सातारा यांनी तक्रार दिली आहे.  दि. ९ मार्च रोजी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली होती. तक्रारदाराचा मुलगा अंकित नवघणे हा दुचाकीवरुन सातारा येथून घरी निघाला होता. वाढे गावच्या हद्दीत एका दुचाकीवरुन आलेल्या व्यक्तीने त्याच्या मानेवर जोराचा फटका मारला. तसेच जवळ गाडी उभी करुन कमरेला चाकूसारखे शस्त्र लावले. त्यानंतर अंकितच्या पँटच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न केला. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक ए. एस. चौधरी हे करीत आहेत.