कोल्हापुरचा पृथ्वीराज पाटील ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी, मुंबईचा मल्ल प्रकाश बनकरला केले चित
19 वर्षांच्या पृथ्वीराज पाटील यांनी जिंकला महाराष्ट्र केसरीचा किताब. पृथ्वीराज पाटील यांना 2022 चा किताब मिळाला आहे. गादी विभागात अंतिम फेरीमध्ये पृथ्वीराज पाटीलने हर्षद कोकटेचा पराभव केला होता. विशाल बनकर विरुद्ध पृथ्वीराज पाटील असा अंतिम लढत झाली. यात पृथ्वीराज पाटीलने विशाल बनकर यांचा पराभव केला आहे.
सातारा : 19 वर्षांच्या पृथ्वीराज पाटील यांनी जिंकला महाराष्ट्र केसरीचा किताब. पृथ्वीराज पाटील यांना 2022 चा किताब मिळाला आहे. गादी विभागात अंतिम फेरीमध्ये पृथ्वीराज पाटीलने हर्षद कोकटेचा पराभव केला होता. विशाल बनकर विरुद्ध पृथ्वीराज पाटील असा अंतिम लढत झाली. यात पृथ्वीराज पाटीलने विशाल बनकर यांचा पराभव केला आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ यांकडून 64वी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा साताऱ्यातील शाहू क्रीडा संकुलात पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब लढतीत कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विजयी झाला. पृथ्वीराजने विशाल बनकरचा 5-4 असा पराभव केला विशाल बनकर आणि पृथ्वीराज पाटील यांच्यात तुफानी कुस्ती झाली. मात्र, अखेर पृथ्वीराज पाटीलने मैदान मारत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आणि मानाची गदा जिंकली आहे. यापूर्वीच पृथ्वीराज पाटीलने पुण्याच्या हर्षद कोकाटेचा पराभव करत गादी विभागातून अंतिम फेरीत विजय मिळवला होता. तर, विशाल बनकरने वाशिमच्या सिकंदर शेखला 13-19 अशा गुण फरकाने हरवत माती विभागातून किताबी लढतीत एन्ट्री केली होती.


